Home > ‘एक राखी कोरोना योध्द्यांसाठी...’

‘एक राखी कोरोना योध्द्यांसाठी...’

‘एक राखी कोरोना योध्द्यांसाठी...’
X

राखीपोर्णिमा भाऊ बहिणीचा सण पण सध्या कोरोनाच्या महामारीमुळे आणि लॉकडाउनमुळे सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. पण खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमेचा सण हा या कोरोनाच्या काळात साजरा करण्यासारखा आहे.

कोरोना काळात आपल्या जीवाची परवा नकरणारे डॉक्टर, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, मेडिकल सेवा , किराणा माल देणारे व्यापारी या सर्वांसोबत राखी पोर्णिमा साजरी करुन त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम युवती कॉंग्रेसच्यावतीने राबवण्यात आला. यावेळी त्या कर्मचाऱ्यांना पेढ़े वाटून स्वच्छता कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 मेडिसिनचे वाटप करण्यात आले.

या बाबत बोलताना कॉंग्रेसच्या प्रदेश समन्वयक कल्याणी रांगोळे म्हणाल्या की, “कोरोना काळात आत्यावश्क सेवा देणारे हे सर्व सन्मानास पात्र आहेत. जे हात आपल्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी जीवाची परवा नकरता नेहमी पुढे असतात ते हात राखीसाठी पात्र असतात. हा सण आत्यावश्क सेवा देणाऱ्या सर्वांसोबत साजरा करुन त्यांच्या कार्याला सलाम आणि कौतुक म्हणून हा सण युवक कॉंग्रेसच्या युवती सेलच्या वतीने साजरा करण्यात आला.” असं म्हटलं आहे.

Updated : 3 Aug 2020 2:27 PM GMT
Next Story
Share it
Top