रीचा अनिरूध्द थत्ते या प्रसिध्द वृत्तनिवेदिका आहेत.
त्या हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये निवेदक आहेत.
त्यांचं काम सांभाळून त्यांनी जिंदगी विथ रीचा नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं
याच नावाने त्यांनी एक कार्यक्रम देखील सुरू केला ज्याची ४ पेक्षा अधिक पर्व आली आहेत.
त्यांच्या या चॅनलचे दहा लाख सबस्क्राईबर्स डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण झाले होते.
त्यामुळे आता त्यांना युट्यूब कडून मिळणारं सुवर्ण बटण मिळालं आहे.
त्यांनी याबद्दलची माहिती ट्विट करून दिली सोबत या गोल्डन बटणचा फोटो पोस्ट केला आहे