हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हॉटस्पॉट (Dharavi Hotspot) ठरला होता.
मात्र दुसऱ्या लाटेत धारावीकरांनी कोरोनाला रोखण्यात आघाडी मिळवली आहे.
दुसऱ्या लाटेदरम्यान शुक्रवारी सोळाव्यांदा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 
धारावीत जसलोक रुग्णालय आणि सिटी बँकच्या माध्यमातून विशेष मोहिम राबवली जात आहे.