ग्रँड-बासममधील सर्वोत्कृष्ट जागा आणि इमारती अनेक दशकांपासून रिकाम्या आहेत. हे रिसॉर्ट शहर आता युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. 15 व्या शतकापर्यंत हे शहर लोकांनी अगदी गजबजलेलं शहर होतं
हाशिमा बेटावरील नैसर्गिक संपत्ती संपुष्टात आल्यानंतर हा सुंदर परिसर ओसाड झाला. सध्या हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. दुसऱ्या महायुद्धात ही एक छावणी होती जिथे 1,000 कोरियन आणि चीनी नागरिक तसेच युद्धकैद्यांना फाशी देण्यात आली.
स्पॅनिश गृहयुद्धादरम्यान ऑगस्ट ते सप्टेंबर 1937 दरम्यान बेल्सी गाव एक आठवडाभराच्या वेढ्यात होतं. १९३९ मध्ये हे गावही युद्धामुळे उद्ध्वस्त झाले. सध्या या गावाचे स्पेनच्या पर्यटनात महत्त्वाचे योगदान आहे.
1870 साली अमेरिकेच्या बोडी क्षेत्राची लोकसंख्या 10,000 होती. सोन्याची खाण असलेला परीसर आता निर्जन शहराच्या सुस्थितीत असलेल्या इमारती आज पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत.
इटलीचं क्राको शहर नेत्रदीपक वास्तुकलांमुळे जगातील सर्वात जास्त भेट दिलेल्या निर्जन शहरांपैकी एक बनले आहे. सांडपाण्याची समस्या, पाणी टंचाई आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे 1980 मध्ये हा परिसर पूर्णपणे ओसाड झाला.
नामिबियाचं कोलमँस्कॉप वाळवंटाच्या मधोमध एक गजबजलेले शहर होते. या भागातील अनेक इमारती अर्ध्या वाळूत बुडाल्या आहेत. 1956 मध्ये सुरू झालेल्या हिऱ्याच्या खाणीचे काम पूर्ण झाल्याने हा परिसर ओस पडला.
दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेला बळी पडलेल्या ओएसजी शहरात 10 जून 1944 रोजी हत्याकांड घडलं. त्या काळात येथील बहुतांश लोक मारले गेले. 1999 नंतर ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले
पर्सी हे इंग्लंडमधील सर्वात प्रसिद्ध, निर्जन आणि मध्ययुगीन गाव आहे. हा परिसर एकेकाळी लोकवस्तीने गजबजलेला होता. आजही तिथे पुरातत्व शास्त्रज्ञ आणि पर्यटकांची गर्दी असते.