World Athletics Championships मध्ये मराठमोळ्या अविनाश साबळेवर लक्ष.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 15 जुलै ते 24 जुलै या दरम्यान अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे.
भारताने 22 खेळाडूंना या स्पर्धेसाठी पाठवलं आहे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेला नीरज चोप्राचा देखील समावेश आहे
मराठमोळा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये आपली दावेदारी सादर करणार आहे.
लांब उडीत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या मुरली श्रीशंकरकडून देखील भारताला पदकाची अपेक्षा आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत त्याने 8.36 मीटर लांब उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला होता.
ट्रिपल जंपर प्रविण चित्रावेल हा फक्त पाचवा भारतीय आहे ज्याने 17 मीटर बॅरियर पार केले आहेत. चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय इंटर स्टेट अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने 17.18 मीटर अंतर कापले होते