तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे.

महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामुल्ला समनगानी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही,असे समनगानी म्हणाले.
उलट महिलांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.