खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षविरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्षविरोधी पावले उचलणे असे आरोप करत ही कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाले आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य पक्षनेतेपदी नियुक्ती केली गेली आहे..
पक्षाचे सर्व अधिकारही एकनाथ शिंदे यांच्याकडेच देण्यात आले.
राष्ट्रीय कार्यकरणीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे.
त्यामुळे आता शिवसेनेतून संजय राऊत यांची हकालपट्टी होणार असल्याची माहिती समोर येत आहे..