पावसाळ्यात या "ठिकाणी" द्या भेटी

मुंबई पासुन जवळच लोणावळा या ठिकाणी भेट द्या, पावसाने भरून वाहणारे सह्याद्रीतले धबधबे मनमोहक आनंद देणारे असतात त्या सोबत प्रसिध्द भुषी डॅम विशेष आनंद देणारा आहे.
हिरवा शालू पांगरलेल्या हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. हा अनुभव तुम्हाला नक्की आनंद देणारा ठरेल
कर्नाळयाला सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. हा लोकांना भूरळ घालणारा आहे.
बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क हे निसर्गरम्य वातावर आणि पुरातन काळातील लेणी असलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या.