यूकेमध्ये ग्रेटर अँग्लिया ट्रेनचं इंजिन खराब झालेल्या रुळांवर लटकलं.
सफोक आणि नॉरफोकच्या सीमेवर रविवारी सकाळी 7.25 वाजता ही घटना घडली.
या सीमेवर असलेल्या हेडीस्को पूलावर रेल्वे ट्रॅकखालील माती वादळी हवेमुळे वाहून गेली होती.
मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर वेळीच त्याने आपात्कालीन ब्रेक दाबून ट्रेनला थांबवलं.
परंतू या सगळ्यात माती सरकलेल्या ट्रॅकवर ट्रेनचं इंजिन येऊन लटकलं.
मोटमनच्या सावधगिरीमुळे या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
या ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी तासभर ट्रेनमध्ये अडकून पडल होते.