आज मुंबईतील तापमान हे साधारण कमीत कमी 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे.

आतापर्यत मुंबई सेंट्रल 49.0 मिलिमीटर तर मुंबई उपनगरात 29.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मागील चोवीस तासातील पर्जन्यमान
विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून कोकण, गोवा व मराठवाडा या ठिकाणी देखील पाऊस पडला आहे.
कोकणात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात, मराठवाड्यात देखील बहुतांशी भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे