अभिनेत्री तिलोत्तमा ही सध्या एका फोटोमुळे समाजमाध्यमांवर चर्चेत आहे.
तिलोतमाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे सध्या तिलोत्तमा चर्चेचा विषय ठरली आहे.
हा फोटो चर्चेचा विषण ठरण्यामागे कारण म्हणजे तिलोत्तमाच्या काखेतले केस.
या फोटोमध्ये तिने एक ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे त्यावर un apologetic असं लिहिलं आहे.
या फोटोच्या कॅपशन मध्ये ती लिहिते, “शरीरावर जे केस असतात त्याबद्दल मी क्षमा मागणार नाही. मला ते आवडतात म्हणून ते मी ठेवले आहे. मी वॅक्स देखील करते आणि काही वेळा करत सुद्धा नाही.”
तिलोतमाला नेटफ्लिक्सवरील सर या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअ क्रिचिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.