देशातील प्रजनन दरात घट झाली आहे. तो २.२ वरून दोनवर आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षण-५ (एनएचएफएस-५) च्या दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारी जाहीर केली आहे.
हे सर्वेक्षण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले
सर्वात कमी प्रजनन दर चंदीगडमध्ये १.४ आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २.४ नोंदवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावर गर्भनिरोधकांच्या वापराचे प्रमाण ५४ वरून ६७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
पण पंजाबमध्ये हा दर अजूनही कमी आहे.
गर्भनिरोधकांच्या आधुनिक पद्धतींचा वापरही वाढला आहे.