'या' देशात डेल्टा व्हेरिएंटचा कहर; दर 60 सेकंदात 111 जणांना लागण
महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने ( CoronaVirus) थैमान घातले आहे.
55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण होत आहे.
अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून येत आहेत.
तर रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे.
आतापर्यंत 6.62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात देखील फुल्ल भरली आहेत.
त्यामुळे अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे.