अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या डेब्यू वेब सीरिज 'द फेम गेम'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
या वेब सीरिजचे पोस्टर स्वतः माधुरीने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘’तिची कहाणी अकथित आहे. पण आता ती येत आहे, तिची कथा जगासमोर घेऊन. 'द फेम गेम' वेब सीरिज २५ फेब्रुवारीपासून OTT प्लॅटफॉर्म येत आहे.”
करिश्मा कोहलीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या मालिकेत माधुरी बरोबर संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी हे कलाकारही दिसणार आहेत.