महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा आज (रविवार, २४ ऑक्टोबर) पार पडणार आहे.
राज्यभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे.
पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे.
चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी ही परीक्षा देणार आहेत.
राज्य शासनाच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही परीक्षा घेतली जाणार आहे.