जगभराममध्ये अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.

अनेक देशांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे.

ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्यासाठी लस विकसित करण्यावर सध्या काम सुरू आहे.

दिग्गज फार्मा कंपनी फायझरनं (Pfizer) ओमायक्रॉन विरोधात तयार करण्यात येणारी लस मार्च महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कंपनीच्या प्रमुखांनी यासंदर्भातील माहिती दिली.