कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अशातच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशात बुधवारी  47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
एका दिवसाआधी देशात 41,965 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद केरळ राज्यात करण्यात येत आहे.