गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख ओसरताना दिसतोय
कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे
सोमवारी पहिल्यांदाच कोरोनाची रुग्णसंख्या एक हजारांच्या खाली नोंदवली गेली आहे
गेल्या चोवीस तासात राज्यात 889 रुग्ण आळढले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
मुंबईतही सोमवारी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहिला मिळाली आहे
गेल्या चोवीस तासात मुंबईत 263 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे
सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे