'पठाण' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ, पाचव्या दिवशी 'पठाण'ची कमाई

'पठाण'च्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातला.
पाच दिवसांत 'पठाण'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २७६.५ कोटींची कमाई केली.
पाचव्या दिवशी सिनेमाने सुमारे ६५ कोटींची कमाई केली.
गेल्या सहा वर्षात हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड सिनेमांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
'पठाण' भारतातच नाही तर जगभरात देखील चांगली कमाई करत आहे.