महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
येणारे 4 ते 5 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
संपुर्ण राज्यात 4 दिवस पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
काल विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगबाद, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्य़ात आला आहे.