अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आणखी तीन दिवस पावसाचे वातावरण असणार आहे

किनारपट्टीच्या भागात एक ते दोन दिवस जोरदार वारे वाहण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात व कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बंगालच्या उपसागरापाठोपाठ गेल्या दोन दिवसांत पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.