Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाची आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे.
दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. 
भारतीय महिला हॉकी संघाची आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत होणार.
सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे.
हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे.