चिंताजनक! राज्यात पहिला झिका आजाराचा रुग्ण सापडला
आधीच कोरोनाचा संकट असतांना राज्यात झिका आजाराचा रुग्ण सापडला आहे.
राज्यात झिका आजाराचा (Zika virus) पहिला रुग्ण पुण्यात (Pune) सापडला आहे. 
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे हा झिकाचा पहिला रुग्ण सापडला आहे. 
सुदैवाने झिकाची बाधा झालेली 50 वर्षीय महिला सुखरुप आहे.