उल्लू अर्जुन या अभिनेत्याचा पुष्पा हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे.

या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी संजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.
इन्स्टाग्राम व फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांवर या गाण्यांचा चांगलाच ट्रेंड चालू आहे.
यामध्ये टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने देखील या चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला आहे.
त्याने डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
या व्हिडिओमध्ये सुरेश रैना त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह ‘श्रीवल्ली’ गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.
 ‘मी हे गाणे करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही.' अस कॅपशन रैनाने दिले आहे.
अल्लू अर्जुननेही सुरेश रैनाचा हा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट करताना ‘ग्रेट’ असे लिहिले.
अलीकडेच डेव्हिड वॉर्नरने पुष्पा चित्रपटाच्या या ट्रेंडिंग गाण्यावरील हुक स्टेपचा व्हिडिओ अपलोड केला आहे.