बॉडी शेमिंगबद्दल सोनालीचा दक्कादायक खुलासा..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे ओळखली जाते.
९० च्या दशकात आपल्या फॅशन आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनालीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.
सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये ‘सरफरोश’, ‘जख्म’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘डुप्लीकेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
“मी बारीक होते त्यामुळे, तू कर्व्ही नाहीस म्हणून तू सुंदर नाहीस असंही मला अनेकदा सांगण्यात आलं.” असा खुलासा सोनालीनं केला.
बॉडी शेमिंगबद्दल सोनाली म्हणते, “आजही समाजात बॉडी शेमिंग होताना दिसतं पण हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं.”