कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत

त्यात आता दिवाळीनंतर महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

मात्र शाळा सुरु झाल्यानंतरही परभणी जिल्ह्यातील एक शाळा तीन आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय

पूर्णा तालुक्यातील गौर गावातील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अशा 69 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली

यामध्ये आठवीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन आठवड्यासाठी ही शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले