उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात शिवसेना आक्रमक
राज्यभरात राणेंच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबादमध्ये महिला शिवसैनिकांनी राणे यांच्या फोटोला पायाखाली तुडवत घोषणाबाजी केली.
यावेळी राणेंच्या फोटोला जोडेमारो आंदोलन सुद्धा करण्यात आले.
नारायण राणेंनी उद्धवठाकरेंबद्दल केलेल्या विधानाचे सुद्धा यावेळी निषेध करण्यात आले.