दिल्लीतील अन्सल प्लाझातील अकिला ACQUILA रेस्टॉरंट ने साडी परिधान केलेल्या महिलेला प्रवेश नाकारला.

या घटनेचा व्हिडीयो एका महिला पत्रकाराने समाजमाध्यमांनर शेअर केला आहे.

प्रवेश नाकारला जाण्याचं कारण एकदमच संतापजनक आहे.

साडी हे स्मार्ट कॅज्युअल्स मध्ये येत नाही असं तिथल्या व्यवस्थापनाचं म्हणणं होतं.

अकिला रेस्टॉरंट मध्ये केवळ स्मार्ट कॅज्युअल्स ला परवानगी असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

या व्हिडीयो नंतर सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

भारतात साडी हे लोकप्रिय परिधान आहे.

सेलिब्रिटींच्या वॉल वर तुम्हाला साडी परिधान केलेले फोटो पाहायला मिळतील.