भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले
सानिया आणि शुआई या जोडीने केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर ६-३, ६-२ अशी मात केली.
सानियाचे हे कारकीर्दीतील ४३ वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले.
यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती.