बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर सोशल मिडीयावर फार ऍक्टीव्ह आहे
ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो तिच्या इन्सटाग्रामवर पोस्ट करत असते.
नुकतंच सईने खणाच्या साडीत फोटोशुट पोस्ट केलं आहे.
या फोटोंमध्ये तिने हिरव्या, केसरी आणि गुलाबी रंगाची खण साडी परिधान केली आहे.
साडीला शोभेल अशी साजेशी खणाची ज्वेलरी घातली आहे.
खणाची साडी आणि ज्वेलरीमध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसत आहे.