'आरटीई'च्या २५ टक्के शाळा प्रवेशालादेखील कोरोनाचा फटका बसला आहे.
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांमधील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यंदाच्या वर्षीसाठी ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश निश्चित केलं.
मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत तब्बल सहा हजार ५४८ जणांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले.