तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकून रिकी केजने इतिहास रचला; म्हणाले, "हा पुरस्कार भारताचा आहे...''

‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी रिकी केज यांना यंदाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
'ग्रॅमी' हा संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे.
यंदाचा ६५ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेमधील लॉस एंजेलिस शहरात पार पडला.
‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमला ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
'रिकी केज' हे तिसऱ्यांदा 'ग्रॅमी' जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
त्यांनी केलेल्या या विक्रमामुळे जगासमोर सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.