जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत अम्मा या एकमेव वलयाभोवती अख्खं तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं
ज्या ज्या क्षेत्रांत जयललिता यांनी पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रांत त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या
एक अभिनेत्री म्हणून आणि त्यानंतर एक राजकारणी म्हणून त्यांनी यशाच्या शिखर गाठलं
1989 ची निवडणूक निर्णायक ठरली होती, जयललिता यांच्या गटानं सर्वाधिक म्हणजे २७ जागा जिंकल्या होत्या
तब्बल अर्धशतक त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं पण, संघर्षानं शेवटपर्यंत अम्मांचा पिच्छा पुरवला