प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. 

टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याला त्यांच्या पद्धतीने निरोप दिला. 
अभिनेत्री राखी सावंतनेही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती भावूक झालेली दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत राखीने लिहिलं आहे की, मी नुकतीच सिद्धार्थच्या घरातून येत आहे. 
सिद्धार्थच्या आईची भेट घेतली असून, ती फक्त एकच गोष्ट सांगत आहे की 'वो चला' गया,असं राखीने सांगितले.