अवघ्या दोन दिवसांवर रक्षाबंधन सण आला असतांना राखी बाजार सजला आहे
बहीण भावाचे अतुट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन
त्यामुळे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी सर्वत्र बाजार फुलला आहे
मात्र ग्राहकांचा खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे राखी व्यावसायिक सांगत आहेत
कोरोना निर्बंध,दुकाने उघडण्यास मनाई या कारणांचा फटका राखी व्यवसायाला बसतोय
राख्यांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या हजारो रुपयांचा परतावा कसा मिळणार, याची चिंता विक्रेत्यांना लागलीय