महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.
राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा प्रज्ञा सातव चालवतील हे स्पष्ट झालं आहे. 
त्यामुळे राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या प्रज्ञा सातव राजकारणात सक्रिय होताना पहायला मिळतील.
तसेच काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे.