ज्योती बालन
ज्योती बालन ही टोकियो पॅरालिम्पिकमधील एकमेव महिला तिरंदाज आहे. भारताला तिच्याकडुन पदकाची मोठी अपेक्षा आहे. ती मुझफ्फरनगरची असुन 12 वर्षांपासून तीरंदाजीचा सराव करत आहे.
पलक कोहली
पलक कोहली ही जालंधरचा भारतीय व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आहे. दुबई येथे झालेल्या जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले होते. टोकियो पॅरालिम्पिक 2021 साठी एकेरी आणि महिला दुहेरीसाठी पात्र ठरणारी ती देशातील एकमेव पॅरा बॅडमिंटन खेळाडू आहे.
पारुल दलसुखभाई
पारुल दलसुखभाई परमार यांना पॅरा-बॅडमिंटन महिला एकेरी SL3 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळाले होते. तिने 2017 BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरी आणि दुहेरीत सुवर्ण जिंकले होते. परमार यांना 2009 मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार आणि गुजरात सरकारने एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
प्राची यादव
प्राची यादव या टोकियो पॅरालिम्पिक साठी पात्र होणार्या पहिल्या भारतीय पॅराकेनो अॅथलीट बनल्या आहेत. प्राची या भारतासाठी माजी चॅम्पियन पॅरा-जलतरणपटू होत्या, पण त्यांच्या प्रशिक्षकानी सुचवल्यानंतर पॅरा कॅनोवर त्यांनी स्विच केले.
सकीना खातून
सकीना खातून या भारतीय पॉवरलिफ्टर आहेत. 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकले होते. 2014 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आणि महिलांच्या लाइटलिफ्टिंग प्रकारात (61 किलो पर्यंत) 88.2 किलो वजन उचलून त्यांनी तिसरे स्थान मिळवले होते.