मात्र,केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन या ऑनलाईन शिक्षणाची पोलखोल झालीय.
संपूर्ण देशात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
यात 2019-20 या शैक्षणिक वर्षात एकूण सरकारी शाळांपैकी केवळ 12 टक्के शाळांकडे इंटरनेट सुविधा आहे.
यात महाराष्ट्रात 71 टक्के सरकारी आणि खासगी शाळांकडे कार्यान्वित कम्प्युटर सुविधा आहे.
देशभरातील 15 लाख शाळांची माहिती संकलित करण्यात आलीय, त्यातून ही माहिती समोर आली आहे.
मार्च 2020 पासून देशातील 26 कोटी विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊलही टाकलेलं नाही.