आता तर डोळ्यातील अश्रूंमधूनही कोरोनाचा संसर्गहोऊ शकतं

शिंकण्याने, खोकण्याने कोरोनाव्हायरस पसरतो हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
 पण आता तर डोळ्यातील अश्रूंमधूनही कोरोनाचा संसर्गहोऊ शकतं.
अमृतसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे.
ताप, सर्दी झाली असेल तर डोळे जळजळतात, डोळ्यातून पाणी येतं. 
अशी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांद्वारे वाहणाऱ्या पाण्यातही कोरोना विषाणू असतात. 
त्यामुळे डोळ्यांद्वारे संसर्ग पसरू शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे