बॉलिवूड अभिनेत्री व डान्सर नोरा फतेही तिच्या डान्स आणि अभीनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:च आगळ वेगळ स्थान निर्माण केलं आहे.

बेली डान्स या नृत्य प्रकाराने तिने लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नोरा कॅनेडा एका हॉटेलमध्ये वेटरेसचं काम करत होती.

कॅनेडा मध्ये बारीक मुलींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा नोराने खुलासा केला आहे.

कॅनडामध्ये बारिक असणं फारसं आवडतं नाही. तिथली ती एक प्रकारची मानसिकता आहे आणि त्यामुळेच आम्ही सारखं खात असायचो. असं ती म्हणाली आहे.

फिगर मेंटेन ठेवण्यासाठी ती कशी काळजी घेते हे देखील तिने सांगितलं आहे.

इथे स्त्रींयांनी थोडं जाड आणि वळणदार म्हणजेच सुडौल बांधा असलेलं लोकांना आवडतं. त्यामुळे मी नेहमीच जाड आणि सुडौल होण्याचा तसचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असते असं ती म्हणते.