कोरोनाने (coronavirus) देशात पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने रुग्ण वाढत आहेत.
केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाची ( covid ) बिघडलेली परिस्थिती चिंतेचा विषय ठरत आहे.
त्यामुळे या दोन्ही राज्यात रात्रीचा कर्फ्यु लावण्याचा सल्ला केंद्रीय गृह सचिवांनी दिला आहे.
गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर गुरुवारी एक निवेदन जारी केले.
जास्त रुग्ण निघत असलेल्या भागात रात्रीच्या कर्फ्यूचा विचार केला पाहिजे असा सल्ला गृहमंत्रालयाने दिला.
या व्यतिरिक्त, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल.