राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ नुसार १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे प्रमान आढळून आले आहे.
असा विक्रम स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे.
जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर देखील सुधारले आहे.
जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे.
२००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले होते.
आता हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले आहे.