पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून,पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
कोकणासह बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणीमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
 दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, रायगड जिल्ह्यातही सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.