भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे.
ही जन आशीर्वाद रॅली नाही तर जन छळवणूक रॅली आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे, पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. 
महापौर पेडणेकर यांनी केलेल्या टिकेनंतर आता भाजपची प्रतिक्रिया पाहणे महत्वाचे ठरेल.