मुंबईत 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात ओरिंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई,नवी मुंबई,ठाणे, पालघरमध्ये आज सकाळपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.