ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे काल वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. 

शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. 
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.
रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर शेन वॉर्नचा एक फोटो शेअर करत हार्ट ब्रेक वाला ईमोजी शेअर केली आहे.
शिल्पा शेट्टीने शेन वॉर्नसोबतचा एक फोटो शेअर करत, महापुरुष अमर असतात, असे म्हटले आहे.
अभिनेत्री व शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकरने यांनी "शेन वॉर्नच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज लेगस्पिनरची उणीव भासेल. त्याच्या आत्म्याला शांती लाभो,’ असे म्हटले आहे.
सनी देओल यांनी, ‘क्रिकेटने आज तारा गमावला. शेन वॉर्नच्या आत्म्याला शांती लाभो,’ असे म्हटले.