जर्मनीची आघाडीची लग्जरी वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझने (Mercedes Benz) गुरूवारी आपली नवीन 'मेड-इन-इंडिया' S-Class भारतीय बाजारात लाँच केली.
या जबरस्त सेडान कारची निर्मिती पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये करण्यात आली आहे.
त्यामुळे या कारची किंमत ६० लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.
या कारची किंमत १.५७ कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे.
पूर्वी या कारवरील आयात शुल्कामुळे किंमत २.१७ कोटी रुपये होती.
पूर्वी ही कंपनी एस-क्लास सेडान भारतात पूर्णतः बिल्ट युनिट (सीबीयू) मार्गाने आणली जात होती.
कंपनीने नवीन S-Class ला एकूण दोन प्रकारांमध्ये सादर केले आहे.
एंट्री लेव्हल व्हेरिएंट S 350 d ची किंमत १.५७ कोटी व S 450 4MATIC प्रकारासाठी १.६२ कोटी रुपये किंमत असणार आहे.