'या' महिला भालाफेकपटूने ऑलिंपिक पदक लिलावात विकलं,कारण...
अनेक खेळाडू ऑलिंपिक पदकाच स्वप्न पाहतात,मात्र हेच पदक एका खेळाडून विकलं
पोलंडची महिला भालाफेकपटू मारीया आंद्रेझिक (Maria Andrejczyk) असे या खेळाडुचं नाव आहे
तिच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मारीयाने टोक्यो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला आहे.
तिनं असं का केलं हे जाणुन घेतल्यावर आपणही तिला सलाम केल्याशिवाय राहणार नाही
एका आठ महिन्याच्या मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत हवी होती
मारीयाला कळताच तिने कोणताही विचार न करता पदक लिलावात ठेवण्याचा निर्णय घेतला
मारियाने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केलं असून, त्याला प्रतिसाद मिळतोय.