लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनय आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं.
‘नटरंग’ चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली.
या चित्रपटामुळे सोनालीला ‘अप्सरा’ ही नवी ओळख मिळाली.
नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम
सोनाली सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच सोनालीने ‘फिल्म फेअर’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
‘धुरळा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनालीने खास लूक केला होता.
‘फिल्म फेअर’च्या रेड कार्पेटवर अप्सरा शिमरी ड्रेसमध्ये अवतरलेली दिसली.
या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
अप्सरेचा ग्लॅमरस अंदाज.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
स्टनिंग सोनाली कुलकर्णी.