चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत.

दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू केले आहे.

नागरिकांनी चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा

पोलीस आणि स्थानिक प्रशासनकडून दरड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.